Home ताज्या बातम्या कागद कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं, लाखो रुपयांचा फटका

कागद कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं, लाखो रुपयांचा फटका

0

कर्जत : गेली तीन वर्ष राज्यात दुष्काळ पडला होता. या दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेततळे बांधण्यात आली. याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र, याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केलं, शेततळे तयार करण्यासाठी लागणारा कागद हा अतिशय खराब प्रतीचा देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. कंपनीला किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात, असाच प्रकार घडला आहे कर्जत तालुक्यातील बरगेवाडी गावामधील शेतकरी राधाकृष्ण  यांच्याबरोबर.

राधाकृष्ण नेटके हे शेतकरी असून कर्जत तालुक्यातील बरगेवाडी येथे त्यांची 18 एकर शेती आहे. कर्जत तालुका वर्षानुवर्ष दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दुष्काळाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर शेततळी बांधण्यात आली. शेततळ्यासाठी लागणारा कागद यामध्ये महत्वाचा ठरला. याचा फायदा घेऊन अनेक कंपन्यांनी यामध्ये शेतकऱ्यांना फसवलं. राधाकृष्ण नेटके यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रासाठी चार लाख रुपयांचा कागद गुजरात येथील सनपेट कंपनीकडून खरेदी केला. मात्र, आठ महिन्यातच हा कागद खराब झाला आणि त्यातलं पाणी वाया गेल्यान कुठलंही उत्पन्न घेता आले नाही. डाळिंबासह एक एकर पॉलिहाऊस मधील गुलाबही भरण्याच्या मार्गावर आहेत. कंपनीकडे वेळोवेळी कागदा विषयी तक्रार करुनही कुठलीही दखल कंपनीने घेतली नाही कंपनीचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते पाणी वाया गेल्यामुळे शेतीचे नुकसान झाले. वेळोवेळी कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला. पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. मात्र, Am News त्या शेतकर्‍यांकडे गेली असल्याची माहिती कळाल्यावर अधिकाऱ्यांनी लगेच त्यांना फोन केला आणि तुमचे काम करून देतो. असे आश्वासन दिले आणि कंपनीची चूक झाल्याचं त्यांनीही मान्य केलं.