कात्रज परिसरात मारहाण करून दहशत निर्माण करण्यावर गुन्हा दाखल

- Advertisement -

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

पुणे, दि. २ जुलै : दि. १ जुलै रोजी रात्री १२.१० वा.च्या
सुमारास जावेद मुल्ला, अजहर शेख, मोहसिन मुल्ला, एक विधिसंघर्षित
बालक यांनी झेंडे यांच्या दवाखान्यासमोर, संतोषनगर, कात्रज येथे दहशत निर्माण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धार्थ सातपुते (वय २०, रा. कात्रज) यांची आई व शेजारील महिला ज्युपिटर टु-व्हिलरवरून कचरा टाकून येत असताना रस्त्यात गाड्या लावून उभे असलेले आरोपी यांनी तिला शिविगाळ केली. ते पाहून फिर्यादी तिथे आला असता जावेद मुल्ला व विधिसंघर्षित बालक यांनी फिर्यादीच्या कानाखाली लावून सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अजहर शेख याने तिथेच कंस्ट्रक्शन साईटवरून कोयता व बांबू आणून तो फिर्यादीच्या मानेवर मारला जो त्याने अडवल्याने फिर्यादीच्या डाव्या हाताला लागला. ते पाहून फिर्यादीचा भाऊ शुभम् तिथे आला असता जावेद मुल्लाने त्यालाही मारहाण केली. त्यांना घाबरून फिर्यादी व त्याचा भाऊ पळून जात असताना आरोपींनी आरडाओरडा करून धमकावून दहशत निर्माण केली.

अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक करीत आहेत.

- Advertisement -