पुणे-परवेज शेख कामशेत पोलिस स्टेशनचे हद्दीत हॉटेल शिवराजचे पाठीमागे, पोलिसांनी धडक कारवाई करून ५२,७७५/- रूपयाची देशीविदेशी दारू रोकड जप्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा उपविभागचे सहायक पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत याना मिळालेल्या बातमीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दबडे यांनी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता पुणे-मुंबई रोड, नायगावचे हद्दीतील शिवरोज हॉटेलच्या पाठीमागील घरात अचानक छापा टाकला असता तेथे देशी-विदेशी दारू व बियर विनापरवाना विकताना आरोपी नवनाथ चोपडे व भाऊ योगेश चोपडे मिळून आले. त्यांचे ताब्यात ५२,७७५/- रूपयाची देशी विदेशी दारू, बियर व रोख रक्कम मिळून आली आहे.
पोलिसानी दोन्ही आरोपीना ताब्यात ठेवून कामशेत पोलिस ठाणे येथे कारवाई केली आहे.
- Advertisement -