कामासाठी वणवण फिरतोय ‘बिग बॉस’चा ‘जल्लाद’; बाबा खानला जगणंही झालंय कठिण

कामासाठी वणवण फिरतोय ‘बिग बॉस’चा ‘जल्लाद’; बाबा खानला जगणंही झालंय कठिण
- Advertisement -



मुंबई : आणि यामुळे अनेक कलाकारांच्या हातून कामे गेल्याने ते बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे काम मिळत नसल्याने दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कामासाठी अनेक कलाकारांना दारोदार भटकावे लागत आहे पण तरीही काम मिळत नाहीये. अशीच परिस्थिती अभिनेते यांची झाली आहे. सलमान खानच्या ” कार्यक्रमात ‘जल्लाद’ म्हणून तो दिसला होता. इतकेच नाही तर सलमानसोबत त्याने ‘वॉन्टेड’, ‘बॉडीगार्ड’, ‘वीर’ आणि ‘जानेमन’ यांसारख्या सिनेमांतही काम केले आहे.

माझी परिस्थिती बिकट आहे
बाबा खानने एका मुलाखतीमध्ये आपली परिस्थिती विषद केली आहे. त्याने सांगितले, ‘ सिनेमाच्या क्षेत्रामध्ये गेल्या १५ वर्षांपासून काम करत आहे. आतापर्यंत सर्व काही ठीकठाक सुरू होते. परंतु आता परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. माझ्याकडे काम नसल्याने आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे.’

भाईजानसोबत केलेय काम
बाबा खानने पुढे सांगितले, ‘ मी भाईजान अर्थात सलमान खानसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केले आहेच शिवाय ‘बिग बॉस’मध्ये देखील काम केले आहे. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘डिपार्टमेंट ‘ या सिनेमात ही काम केले आहे. ‘आर राजकुमार’मध्येही काम केले होते. परंतु करोनाचा फैलाव होऊ लागल्याने देशात लॉकडाऊन लागला. त्यानंतर माझ्या हातातील कामे गेली. काम नसल्याने माझी परिस्थिती खूपच बिकट झाली आहे.’

मला फक्त काम हवे आहे
बाबा खानने पुढे सांगितले की, ‘ मला कुणाही कडून आर्थिक मदत नको आहे. फक्त काम हवे आहे…’ मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, ‘रोज घरातून मी कामाच्या शोधासाठी बाहेर पडतो. परंतु मला कुणीच काम देत नाही. आतापर्यंत सिनेमांमध्ये निगेटिव्हच भूमिका केल्या आहे. त्यामुळे माझी तशीच इमेज झाली आहे. मी सर्व निर्माते, दिग्दर्शक, कास्टिंग दिग्दर्शकांना हात जोडून विनंती करतो की मला काम द्या… बाकी मला काही नको…’

भाड्याच्या घरात राहतो
बाबा खान यांनी सांगितले की, ‘ मी एका भाड्याच्या घरात राहतो. माझ्यावर आठ लोक अवलंबून आहेत. काम मिळत नसल्याने अनेक अडचणींना आम्हाला सामोरे जावे लागत आहेत. माझी परिस्थिती जर भाईजानला कळली तर ते काम मिळवून देण्यासाठी नक्की मदत करतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘बिग बॉस’ मध्ये ‘जल्लाद’ ही भूमिका चिंतर गंगर साकारत होता. परंतु काही काळाने त्याने हा कार्यक्रम सोडला. त्यानंतर बाबा खानला ही भूमिका देण्यात आली होती. आता लवकरच ‘बिग बॉस’चे १५ वे पर्व सुरू होणार आहे. त्यात ‘जल्लाद’ची भूमिका मिळावी, अशी अपेक्षा बाबा खानने व्यक्त केली आहे.



Source link

- Advertisement -