काय म्हणावं, कर्ज वसूल करण्यासाठी रेस्टोरंटमध्ये हजारो झुरळे फेकली!

काय म्हणावं, कर्ज वसूल करण्यासाठी रेस्टोरंटमध्ये हजारो झुरळे फेकली!
- Advertisement -


तैपई: तैवानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी एका रेस्टोरंट्सवर हल्ला केला. मात्र, हा हल्ला बंदूक-लाठी काठीने करण्यात आला नव्हता. तर, हा हल्ला झुरळांच्या माध्यमातून करण्यात आला. या रेस्टॉरंट्समध्ये हजारो झुरळं फेकून काही अज्ञात फरार झाले. घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत न दिल्यामुळे त्रास देण्यासाठी हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी म्हटले. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहेत.

हिंसक हल्ल्याचा गुन्हा दाखल


पोलीस आयुक्त चेन जिया चांग यांनी सांगितले की, रेस्टॉरंटच्या मालकाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका टोळीकडून कर्ज घेतले होते. त्यांनीच हे कृत्य केले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. झुरळं फेकणे हा हिंसक हल्ला असल्याचे समजले जाते आणि त्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी असेही त्यांनी म्हटले. रेस्टोरंटमध्ये फेकण्यात आलेले झुरळं ही लहान आकाराची होती. सीसीटीव्ही फूटजेमध्ये दोन व्यक्ती झुरळं फेकून रेस्टोरंटच्या बाहेर पळत असल्याचे दिसत आहे.

वाचा:अब्जाधीश बिल गेट्स यांचा घटस्फोट; मुलांना मिळणार इतकी संपत्ती

वाचा:आश्चर्यच ! महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म दिला

पाहा: मेट्रो रेल्वेसह पूल कोसळला; २३ ठार, ७० हून अधिक जखमी

या झुरळ हल्ल्यानंतर रेस्टॉरंटला पूर्णपणे स्टेरलाइज करण्यात आले. या हल्ल्या प्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्याशी त्यांचा संबंध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेस्टोरंटच्या मालकाने कर्ज म्हणून घेतलेली रक्कम न दिल्याने हा हल्ला झाल्याचे म्हटले जाते.



Source link

- Advertisement -