पुणे : परवेज शेख दिनांक-०८/१०/२०१९ रोजी गुन्हे शाखा युनिट ३,कार्यालयात हजर असताना पो. विल्सन डिसोझा यांना बातमी मिळाली की, एक इसम तस्करी केलेले काळविटाच्या शिंगांची विक्री करण्याकरीता बिबवेवाडी भागात येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ अधिकारी यांना कळवून वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे यांचे मदतीने अप्पर डेपो, बिबवेवाडी पुणे या ठिकाणी सापळा रचून 04:50 वाजताचे सुमारास इसम नामे नाव अजिंक्य नवनाथ शितोळे,वय-19 वर्षे रा. विघ्नहर नगर,महेश सोसायटी,पुणे ३७ यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून अमुल्य किमतीची फिक्कट तपकिरी रंगाचे,इंग्रजी व्हि आकाराचे काळविटाच्या शिंगाचा एक जोड जप्त करण्यात आला आहे. प्रस्तुत प्रकरणी वनअधिकारी यांचे मदतीने सदर बाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे, श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे, श्री. बच्चनसिंह, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रतिबंधक, डॉ.शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेन्द्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक किरण अडागळे, पोलीस कर्मचारी किशोर शिंदे, मेहबुब मोकाशी, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, नितिन रावळ, संदिप राठोड, अतुल साठे यांनी केली आहे.


























WhatsApp