हायलाइट्स:
- अक्षय कुमारने काश्मीरमधील शाळेच्या उभारणीसाठी दिले एक कोटी रुपये
- शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला झाला प्रारंभ
- शाळेला दिले अक्षय कुमारच्या दिवंगत वडिलांचे नाव
बीएसएफने शेअर केले फोटो
अक्षयने शाळेला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर मंगळवारी या शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. याबाबतची अधिक माहिती देताना बीएसएफचे राकेश अस्थाना यांनी सांगितले की, ‘पद्मश्री अक्षय कुमार, बीएमडब्ल्यूए चे अध्यक्ष अनु अस्थाना आणि एसडीडी वेस्टर्न कमांड बीएसएफ सुरेंद्र पवार यांच्यासह वेबलिंकच्या माध्यमातून काश्मीरमधील ‘हरिओम भाटिया एज्युकेशन ब्लॉक गर्व्हमेंट मिडिल स्कूल, नीरू’ या शाळेची स्थापना होत आहे. ‘
शाळेला दिले वडिलांचे नाव
अक्षय कुमारने ज्या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी मदत केली ती शाळा नीरू गावात आहे. या शाळेला अक्षयच्या दिवंगत वडिलांचे म्हणजे हिओम भाटिया यांचे नाव देण्यात आले आहेत. आता ही शाळा हरिओम भाटिया एज्युकेशन ब्लॉक गर्व्हमेंट मिडिल स्कूल, नीरू या नावाने ओळखली जाणार आहे. शाळेच्या उभारणी नंतर या गावातील तसेच आसपासच्या गावातील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेऊ शकणार आहेत.
अक्षय कुमारने १७ जून रोजी नीरू गावाला भेट दिली होती. त्यावेळी येथे तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांसोबत त्याने धम्माल, मस्ती केली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर त्याने शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले होते, ‘सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करणा-या बहादूर जवानांसोबत एक दिवस घालवला. येथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो. ख-याखु-या आयुष्यातील या नायकांबद्दल माझ्या मनात फक्त आणि फक्त आदर आणि सन्मान आहे… ‘ खूपच व्हायरल झाले होते.
दरम्यान, अक्षय कुमारच्या कामाबद्दल सांगायचे तर ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. मात्र, करोनामुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय अक्षयने ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. तर तो ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘राम सेतु’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.