Home शहरे मुंबई कासारवडवली येथील कॅन्सर रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा ऑगस्टमध्ये

कासारवडवली येथील कॅन्सर रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा ऑगस्टमध्ये

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

ठाणे : मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाच्या मदतीने घोडबंदररोडवरील कासारवडवली  येथे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येणार असून याबाबत आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री, पालकमंत्री ठाणे जिल्हा श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कासारवडवली येथे हे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा हस्तांतरीत करणे, तसेच रुग्णालयाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याबाबत व इतर बाबींवर महत्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली. तसेच रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा येत्या ऑगस्टमध्ये करण्यात येणार असल्याचेही जवळपास निश्चित करण्यात आले. ठाण्यातील या रुग्णालयाबाबत चर्चा करण्यासाठी टाटा कॅन्सर मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व श्री. संजीव सूद हे ही या बैठकीस उपस्थित होते

      राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री, ठाणे जिह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस महापौर मिनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, नगसेवक एकनाथ भोईर, संतोष वडवले, नरेश मणेरा, दिलीप बारटक्के,   विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त 1 राजेंद्र अहिवर आदी उपस्थितीत होते.

      कॅन्सरचे रुग्णालय ही नागरिकांची गरज असून हे रुग्णालय मध्‍यवर्ती ठिकाणी उभारण्‍्यात येत असल्याने याचा फायदा जवळपासच्या नागरिकांना होऊ शकेल, त्यामुळे रुग्णालयास मान्यता मिळण्‍्यास कोणताही अडथळा येणार नाही असा  विश्वास     पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

      या  रुग्णालयास शासनाकडून निधी उपलब्ध होईपर्यत महापालिकेतर्फे आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्‍्यासाठी आवश्‍यक तरतूद महापालिकेतर्फे करण्‍्यात येईल असे आयुक्त संजीव जयस्वाल   यांनी यावेळी नमूद केले

 ठाण्यातील कॅन्सर  रुग्णालय हे मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाच्या मदतीने सुरू करण्यात येणार असून याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून भूमिपूजन सोहळा ऑगस्टमध्ये करण्याचे जवळपास निश्चित करण्यात आले.  या बैठकीस जितो या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

       ——————————————————-

फोटो ओळ ः घोडबंदररोडवरील कासारवडवली येथे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याबात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात चर्चा करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री, पालकमंत्री ठाणे जिल्हा श्री. एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे, टाटा कॅन्सर मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व श्री. संजीव सूद, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, नगसेवक एकनाथ भोईर, संतोष वडवले, नरेश मणेरा, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त 1 राजेंद्र अहिवर आदी.