काही तरी धमाकेदार होणार; इंडियन आयडलमध्ये राखी सावंतची एंट्री

काही तरी धमाकेदार होणार; इंडियन आयडलमध्ये राखी सावंतची एंट्री
- Advertisement -


हायलाइट्स:

  • इंडियन आयडल १२ मध्ये राखीची एंट्री!
  • राखीने सोशल मीडियावर दिली माहिती
  • चाहत्यांमध्येही निर्माण झाली खूप उत्सुकता

मुंबई : विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. वादानंतर मिकाबरोबर राखीने साधलेला संवाद असो वा मस्तानीच्या लूकमध्ये फिरणारी राखी अशा विविध कारणांमुळे ती सातत्याने चर्चेत असते. याआधी राखी बिग बॉस १४ कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यामुळे तिला एक वेगळीच ओळख मिळाली होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या चाहत्यांना तिचे विचार ऐकता आले. परंतु आता वेगळ्याच कारणामुळे राखी चर्चेत आली आहे.

इंडियन आयडल १२ मध्ये राखी सावंत
बिग बॉसच्या घरामध्ये धम्माल उडवणारी राखी सावंत आता इंडियन आयडल १२ कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन धडकली आहे. ही माहिती खुद्द राखीनेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करून दिली आहे. राखीचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. फोटोंबरोबरच राखीने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, ‘ मी इंडियन आयडल १२ च्या सेटवर पोहचली आहे. येथे येऊन मी खूपच उत्साहित झाली आहे. मला खूप मजा येते आहे. लवकरच मी सहभागी झालेला भाग प्रसारित होणार आहे. तुम्ही देखील हे पाहण्यासाठी उत्सुक असाल ना? तर मग तयार रहा… आमचा इंडियन आयडल कार्यक्रम पाहण्यासाठी. ‘
राखीने तिचे सेटवरचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती कोणत्या तरी हॉटेलच्या रूममध्ये दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये तिने भगव्या रंगाची साडी आणि गोल्डन रंगाचा ब्लाऊज परिधान केले आहे. त्याबरोबरच तिने खूप सारे दागिने घातले आहे. राखी इंडियन आयडलमध्ये सहभागी होणार असल्याने तिचे चाहते कमालीचे उत्सुक आणि आनंदीत झाले आहेत.

राखीने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती गायिका सोनू कक्कड, अनु मलिक आणि कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण यांच्यासोबत दिसते आहे.


इंडियन आयडलच्या सेटवर

राखीला पाहून तिचे चाहते खूपच आनंदीत आणि उत्साहित झाले आहेत. राखीच्या या सर्व फोटोंवर ते भरभरून कॉमेंट करत आहेत. एका युझरने लिहिले आहे, ‘ खूपच सुंदर दिसत आहात…’ दुस-या एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘तुम्ही कार्यक्रमात येत आहात तर तो नक्कीच बघायला पाहिजे.’

दरम्यान, याआधी राखी बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाली होती आणि तिथेही तिने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता ती इंडियन आयडल १२ च्या सेटवर काय काय धम्माल करते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.





Source link

- Advertisement -