उल्हासनगर :- शफिक शेख
किरकोळ भांडणातुन सहा जणां च्या टोळीने एका युवकाला जबर मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी काही तासातच सहा आरोपींना अटक केली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार उल्हासनगर कॅम्प – ३ येथील खन्ना कम्पाउंड परिसरात रात्री ११च्या सुमारास वेदप्रकाश व राकेश यांच्यात किरकोळ वाद झाला होता. तेव्हा वेदप्रकाश याने राकेशला चापटीने मारहाण केली.याचा राग येऊन वेद प्रकाशाला मारण्यासाठी आरोपी मागे धावले. हातातील लोखंडी चाकू, कोयता, व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.यात वेदप्रकाश हा गंभीर जखमी झाला.त्याला उल्हासनगरच्या एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात पोहोचण्या आधीच मयत झाल्याने उल्हासनगर च्या मध्यवर्ती रुग्णालयात आणले गेले.डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.मारहाण करणाऱ्या आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यवर्ती पोलिसानी त्वरीत तपास करुन सहा आरोपीना अटक केली असून पुढील तपास स.पो.नि. कोकरे हे करीत आहेत.
काही तासातच आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश.
- Advertisement -