Home मनोरंजन काही नाती आयुष्यभरासाठी बांधली जातात; खास व्यक्तीसाी मिलिंद गवळीनं शेअर केली भावुक पोस्ट

काही नाती आयुष्यभरासाठी बांधली जातात; खास व्यक्तीसाी मिलिंद गवळीनं शेअर केली भावुक पोस्ट

0
काही नाती आयुष्यभरासाठी बांधली जातात; खास व्यक्तीसाी  मिलिंद गवळीनं शेअर केली भावुक पोस्ट

[ad_1]

हायलाइट्स:

  • मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
  • २० वर्षांपूर्वी अर्चना पाटकर यांच्याबरोबर केले होते काम
  • जुन्या आठवणींना मिलिंद यांनी दिला उजाळा

मुंबई :’ आई कुठे काय करते‘ या मालिकेतील अभिनेता मिलिंद गवळी आणि अर्चना पाटकर यांच्यात एक वेगळेच नाते आहे. मिलिंद आणि अर्चना पाटकर यांनी २५ वर्षांपूर्वी एका मराठी सिनेमामध्ये आई-मुलाची भूमिका साकारली होती. आता आज हे दोघेजण ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत पुन्हा माय-लेकाच्याच भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मिलिंद गवळी यांनी त्यांच्या आणि अर्चना पाटकर यांच्या नात्यांना उजाळा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

काय लिहिले आहे पोस्टमध्ये

या आठवणींना मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून उजाळा दिला आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘ ‘जवळजवळ पंचवीस वर्ष उलटून गेली “सून लाडकी सासरची” या चित्रपटाला आणि गेल्या पंचवीस- तीस वर्षांमध्ये खूप खूप काही बदलून गेले. त्या सिनेमाचे दिग्दर्शक वि. के. नाईक, निर्माता जी जी राज वासवानी यांनी केले होते. आज हे दोघेही आता आपल्यात नाहीत. “सून लाडकी सासरची” नंतर नाईकसाहेबांबरोबर मी जवळपास पाच सिनेमे केले, वासवानी बरोबर चार सिनेमे केले, तर सिनेमांमध्ये अशोकमामा होते त्यांच्याबरोबर नंतर सहा सिनेमे केले. ऐश्वर्या नारकर बरोबर “दुहेरी” नावाची एक सिरीयअल केली. मात्र,अतुल परचुरे बरोबर काम करण्याचा योगच नाही आला. मात्र, एक जीवश्चकंठश्च आयुष्यभरासाठी मित्र मिळाला.

काही नाती नियतीने बांधलेली असतात
मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘ “सून लाडकी सासरची” त्या सिनेमामध्ये आईची भूमिका अर्चनाताई पाटकर यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या मिस्टरांबरोबर म्हणजे राजू पाटकर यांच्या बरोबर एक सिरीअल केली होती. आता तब्बल दोन दशकानंतर परत माय-लेक म्हणून मी आणि अर्चनाताई “आई कुठे काय करते” मध्ये एकत्र आलो आहोत. वीस वर्षांपेक्षा जास्तीचा काळ मध्ये गेला होता. परंतु एकमेकांविषयी तितकेच प्रेम, तितकाच आदर आणि त्याच्यापेक्षा जास्त मजा गेल्या दोन वर्षांपासून आम्ही “आई कुठे काय करते” या सिरीअल मध्ये करतो आहोत. ‘Reel and Real sometimes gets mixed-up, mother-Son feelings gets real, and you forget it’s Reel.’ या इंग्रजीतील वाक्याप्रमाणे खरंच काही नाती सिनेमातली किंवा सिरिअलमधली वाटतच नाहीत. एकमेकांबद्दलच्या भावना, एकमेकांबद्दलच प्रेम अगदी खरे होऊन जाते. आम्ही सगळे कलाकार नियतीने किंवा नशिबाने बांधले असतो किंवा एकत्र येतो. एकदा सिनेमा किंवा सिरीअल संपली की तो कलाकार आपल्याला केव्हा भेटेल याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. कुणी नंतर भेटेल की नाही हे सुद्धा माहिती नसते. मागच्या वेळेला “तू अशी जवळी रहा” या सिरीअलमध्ये सुलेखा तळवलकरबरोबर असेच वीस-बावीस वर्षानंतर काम केले. आता अर्चनाताईबरोबर काम करायचा सुवर्णयोग आला आणि माय-लेकाची जोडी वीस वर्षांपूर्वी एकत्र आली होती. तेव्हा चार थिएटरमध्ये “सून लाडकी सासरची” हा सिनेमा लागला होता. या सिनेमाने सिल्वर ज्युबली साजरी केली होती. आता त्या सिनेमातील आम्हा मायलेकांची जोडी आता “आई कुठे काय करते” या मालिकेत पुन्हा एकदा एकत्र काम करत आहोत. सध्या ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. हा सुवर्ण योगच म्हणायचा, दुसरं काय. अर्चनाताईंना खूप खूप प्रेम आणि उदंड आयुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना, love you Archu Tai…..’

दरम्यान, मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. मिलिंद चाहत्यांनी त्यांनी व्यक्त केलेल्या पोस्टवर विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.



[ad_2]

Source link