म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंत १०.५८ किमी मार्गाचे काम भरधाव वेगात सुरू आहे. सध्या त्यातील ३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच, भरावाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून त्यात १०० हेक्टर भराव टाकण्यात आला आहे. समुद्राकडील संरक्षक भिंतीचे काम ७० टक्क्यांपर्यंत पूर्णत्वास गेले आहे.
हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवरही प्रकल्पाचे काम योग्य ती खबरदार घेऊन केले जात आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या मार्गात तीन आंतरबदल आणि चार वाहनतळे असून त्यापैकी.आतरबदलांची लांबी १५.६६ किमी आहे. या प्रकल्पात प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत जमिनीखाली प्रत्येकी दोन किमीचे दोन बोगदे खणले जात आहे.

सागरी किनारा रस्ता प्रकल्पात पादचारी मार्गाची लांबी ८.५ कि.मी. तर, समुद्र भिंतीची लांबी ७.४७ किमी आहे. या प्रकल्पात देशात प्रथमच एकलस्तंभी पाया आणि ”सकार्डो नोझल” ही वायुविजन यंत्रणा बसवली जाणार आहे.
प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांच्या मुखाजवळ सकार्डो नोझल ही यंत्रणा बसविली जाणार आहे. यामुळे एखाद्या गाडीस आग लागून त्यातून निर्माण होणारा धूर हा यंत्रणेच्या सहाय्याने बाहेरच्या दिशेने ढकलला जाईल.
- Advertisement -