Home मनोरंजन किन्नौर भूस्खलनात चाहतीचं निधन, कंगना रणौतनं शेअर केली इमोशनल पोस्ट

किन्नौर भूस्खलनात चाहतीचं निधन, कंगना रणौतनं शेअर केली इमोशनल पोस्ट

0
किन्नौर भूस्खलनात चाहतीचं निधन, कंगना रणौतनं शेअर केली इमोशनल पोस्ट

[ad_1]

हायलाइट्स:

  • हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात ९ पर्यटकांनी मगावला जीव
  • कंगना रणौतची चाहती डॉ. दिपा शर्माचाही झाली भूस्खलनात मृत्यू
  • कंगनानं चाहतीसाठी लिहिलेली इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात रविवारी झालेल्या भूस्खलनात ९ पर्यटकांचा मृत्यू झाला. या पर्यटकांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या एका चाहतीचाही समावेश होता. कंगनाची चाहती डॉ. दिपा शर्मा हिचाही मृत्यू झाला. याबाबत कंगना रणौतनं तिच्या सोशल मीडिया हँडलवरून माहिती दिली आहे. तिनं डॉ. दिपा शर्मासाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. आपल्या पोस्टमधून कंगनानं चाहतीला श्रद्धांजली वाहिली आहे.

कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिनं चाहती डॉ. दिपा शर्माच्या आठवणी शेअर केल्या आहेत. कंगनानं तिच्या पोस्टमध्ये डॉ. दिपासाठी लिहिलं, ‘ती माझी खूप मोठी चाहती होती. तिने अनेकदा मला लेटर्स आणि भेटवस्तू पाठवल्या होत्या. ती माझ्या मनालीच्या घरी देखील आली होती. त्यामुळे हा खूप मोठा धक्का आहे माझ्यासाठी’

AssignmentImage-277855648-1627360537

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगनानं आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यात तिनं पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पावसाळ्याचे दिवस असताना डोंगरांच्या आसपासच्या भागात फिरण्याचं टाळा असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कंगनाची चाहती डॉ. दिपा शर्मा ही मूळची जयपूरची राहणारी असून ती पहिल्यांदाच सोलो ट्रीपवर हिमाचल प्रदेशला गेली होती. या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच दिपानं तिच्या इन्स्टाग्रावर या ठिकाणचे काही सुंदर फोटो शेअर केले होते.

‘द ताशकंद फाइल्स’ या चित्रपटाचे निर्मात विवेक अग्निहोत्री यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच दिपाच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘दिपानं या जगाचा निरोप घेतला आहे यावर मला विश्वास बसत नाहीये. या भूस्खलनात तिनं आपले प्राण गमावले. ८ तासांपूर्वी ती हिमलयाचे फोटो शेअर करत होती. ती खूपच उत्साही मुलगी होती. माझ्याकडे शब्दच नाही. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.’

[ad_2]

Source link