हायलाइट्स:
- किम शर्मा आणि लिएंडर पेस यांचे फोटो सोशल मीडियावर आहेत चर्चेत
- लिएंडर पेसच्या आधी किम शर्मा करत होती अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट
- किम- लिएंडरच्या नात्यावर हर्षवर्धन राणेनं दिली प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियावर लिएंडर पेस आणि किम शर्मा यांच्या या रोमँटिक फोटोशूटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दोघंही गोव्यातील कोणत्यातरी रेस्तरांमध्ये असल्याचं या फोटोंवरून समजतंय. जेव्हा हे फोटो आणि किम- लिएंडरच्या नात्याबद्दल किमचा एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धन राणे याला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, ‘मला याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या सगळ्यावर ते दोघंच प्रतिक्रिया देतील तर उत्तम ठरेल. पण जर हे खरं असेल तर हे दोघंही सध्याचं सर्वात हॉट कपल आहेत.’
हर्षवर्धन राणे आणि किम शर्मा हे मागची काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. मागच्या वर्षीच दोघंही वेगळे झाले. अर्थात दोघांनीही आपलं नातं कधीच कबुल केलं नव्हतं पण सोशल मीडियावर मात्र एकमेकांसोबत फोटो शेअर केले होते. त्यामुळे त्यांचं ब्रेकअप कधी आणि कोणत्या कारणानं झालं हे समजू शकलं नाही.
दरम्यान लिएंडर पेस आणि किम शर्मा एकमेकांना कुठे आणि कधी भेटले याबाबतही कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांचे चाहते हैराण झाले आहे. दोघंही पहिल्यांदा एकमेकांना कधी भेटले, कसे भेटले आणि कुठे भेटले असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. पण किमच्या आयुष्यात लिएंडरच्या एंट्रीमुळे तिचे चाहते मात्र खूश आहेत.