Home गुन्हा किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

0

किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2015 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत भेकराईनगर, फुरसुंगी येथे घडली.

पती मल्लिकार्जुन रोहिदास बेलुरे, सासरे रोहिदास संगप्पा बेलुरे, सासू कलावती रोहिदास बेलुरे, नणंद चारुशीला प्रसादकुमार देगाव (सर्व रा. रोहितला निवास, नवयुग कॉलनी, भेकराई नगर, फुरसुंगी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जून 2015 ते 7 सप्टेंबर 2019 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांचा विविध कारणासाठी शाररीक व मानसिक छळ केला. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेऊन सासरच्यांविरोधात गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.