Home ताज्या बातम्या किल्ले धारूर शहरांमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट, व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण

किल्ले धारूर शहरांमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट, व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण

0

बीड : धारूर शहरांमध्ये मागील अनेक दिवसांपासून दोनशे रुपयाच्या व शंभर रुपयाच्या नोटा बनावट येत आहेत व या नोटामुळे व्यापाऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात सध्या चिंतेचे वातावरण आहे. धारूर शहरातील अनेक व्यापा-यांकडे 100 व 200 रूपयाच्या नोटा आढळुन आल्या आहेत. या बनावट नोटा देऊन व्यापा-यांची फसवणूक केली जात आहे. अशा नोटांमुळे व्यापार्‍यांची फसवणूक होत असल्याने बाजापेठेत याच नोटांची चर्चा होताना दिसुन येत आहे.

अशा दोनशे रुपयाच्या व शंभर रुपयाच्या नोटा मार्केटमध्ये आहेत. तरी व्यापाऱ्यांनी नोटा पाहून घ्याव्यात व आपली फसवणूक थांबवावी. संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी व यापऱ्यांची फसवणूक थांबवावी अशी मागणी व्यापारी वर्गातुन होत आहे