‘जिंदगी का सफर’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. किशोरदांचे चिरंजीव अमित कुमार हे या मैफलीत गाणी सादर करणार आहेत. ही केवळ संगीत मैफल नसून या माध्यमातून मानवी जीवनावर भाष्य करण्यात आलं आहे. करोनासारखे संकट माणसाच्या आयुष्यात येईल अशी कल्पना कधीच कोणी केली नव्हती. मात्र, ते आले. आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. आयुष्य हे असेच असते. कधी हा ‘सफर सुहाना’ असतो तर कधी ती एक ‘पहेली’ असते. ही ‘पहेली’ उलगडतानाच आयुष्याच्या प्रवासाचा आनंद घ्यावा लागतो. ‘चलती रहे जिंदगी’ असं गुणगुणत राहावं लागतं. अमित कुमार या संगीत मैफलीतून हाच संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या संगीतमय प्रवासात गायिका शैलजा सुब्रमण्यम त्यांना साथ करतील. कार्यक्रमाचे संगीत संयोजन अनुपम घटक यांचं आहे.
किशोरदांच्या सदाबहार गाण्यातून अनुभवा ‘जिंदगी का सफर’
मुंबई: करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळं पुन्हा एकदा लॉकडाऊनचं सावट आपल्या डोक्यावर आहे. साहजिकच घराबाहेर पडण्यावर मर्यादा येणार असून संपूर्ण वेळापत्रक नव्यानं आखावं लागणार आहे. हे करताना ‘घरबसल्या’ मनोरंजनाच्या जागा शोधाव्या लागणार आहेत. अशा मनोरंजनाच्या शोधात असलेल्यांसाठी खूशखबर आहे.
- Advertisement -