Home शहरे उस्मानाबाद कुंपणातील विजप्रवाहामुळे गायीचा मृत्यू

कुंपणातील विजप्रवाहामुळे गायीचा मृत्यू

0

उस्मानाबाद । १५ जुलै : शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने त्याच्या धक्क्याने एका गायीचा मृत्यू झाला आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बोरी येथे घडली आहे.

बोरी येथील लक्ष्मण अच्युत शिंदे यांनी शेतातील भुईमूंगाच्या पिकास तारेचे कुंपन करुन त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. 10 जुलै रोजी शेजारील अनिकेत बापु शिंदे यांची जर्शी गाय त्या कुंपनास चिकटुन विद्युत झटक्याने मृत्यू पावली. अनिकेत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण शिंदे यांच्या विरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.