Home शहरे पुणे कुरकुंभ मधील अल्कली अमाईन्स या रासायनिक कंपनीला भीषण आग

कुरकुंभ मधील अल्कली अमाईन्स या रासायनिक कंपनीला भीषण आग

0

पुणे: पुणे सोलापूर मार्गावर कुरकुंभ गावातील अल्कली अमाईन्स कंपनीत मोठ्या प्रमाणावर रसायनांचा साठा होता. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. रसायनांचे बॅरल असल्याने स्फोट होऊ लागले. त्यामुळे आगीचे मोठमोठे लोळ उठत होते. सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी परिसराची पूर्ण नाकेबंदी केली होती. स्फोट होत असल्याने अग्निशमन बम्बना आगीपर्यंत पोहोचणे अवघड होतं होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी पाटसजवळ पुणे-सोलापूर महामार्ग बंद केला होता.