Home ताज्या बातम्या कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

0
कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने शेती व्यवसाय विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येणाऱ्या काळात कृषी उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला निश्चित चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील उद्योजकांच्या संस्थांचे पदाधिकारी व संबंधित प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, सर्वश्री आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, हिरामण खोसकर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. तसेच उद्योजक, औद्योगिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उद्योजक व अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बोलतांना पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मिती या विषयांना शासन स्तरावर विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक उद्योग विकसित होत असून रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने नवीन प्रकल्पांची निर्मिती करणे व जुने बंद असलेले उद्योग पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. येत्या 15 दिवसात जिल्हाधिकारी, नाशिक महानगरपालिका आयुक्त, उद्योजक संस्थांचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांची समिती स्थापन करून समितीच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात औद्योगिक विकासाच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रात वीज, रस्ते, वाहतुक, औद्येगिक क्षेत्रातील अतिक्रमण, ट्रक टर्मिनल व्यवस्था व सांडपाणी प्रश्न तसेच कारखान्यांमधील औद्योगिक कचऱ्याचे व्यवस्थापन आदी प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच मानवेतेच्या दृष्टीकोनातून कामगार वर्गाला प्रोत्साहन देवून त्यांच्या सबळीकरणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी केले.

000000000