हायलाइट्स:
- कृष्णाचे रूप साकारणाऱ्या अभिनेत्याची झाली अशी फजिती
- झोपाळा एका बाजूने तुटला आणि अभिनेता पाण्यात पडता पडता वाचला
- खुद्द अभिनेत्यानेच सोशल मीडियावर शेअर केला गंमतीशीर व्हिडिओ
काय आहे व्हिडिओमध्ये
रोहमनने त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या व्हिडिओ त्याच्या एका चित्रीकरणावेळचा आहे. यामध्ये रोहमन एका पूलाच्यावर बांधलेल्या झोपाळ्यावर कृष्णाच्या रुपामध्ये दिसत आहे. त्याच्या हातात बासरी आहे आणि खाली पाण्यामध्ये गोपिका आहेत. त्यांना तो बासरी वाजवून दाखवतो अशा एका प्रसंगाचे चित्रीकरण सुरू आहे. हे सगळ्याचे चित्रीकरण सुरू असताना अचानक रोहमन बसलेल्या झोपाळ्याची दोरी अचानक तुटते आणि झोपाळा एका बाजूने कलंडतो… हे सारे घडत असताना रोहमन झोपाळ्यावरून पाण्यात पडतात पडता कसाबसा स्वतःला सावरतो.
हा व्हिडिओ शेअर करत रोहमनने लिहिले आहे, ‘चित्रीकरण सुरू असताना झोपाळ्याची एक बाजूची दोरी अचानक तुटली आणि मी हवेत तरंगू लागलो.’ या पोस्टमध्ये रोहमनने त्याची सहकलाकार नम्रताचे कौतुक केले आहे. रोहमन शॉल आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हे काही वर्षांपासून लिव-इनमध्ये रहात आहेत. रोहमनचे आणि सुष्मिताच्या दोन्ही मुलींचे खूप छान बाँडिंग आहे. तो मुलींसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो.