कॅनडामध्ये या गायकावर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला

- Advertisement -


प्रसिद्ध पंजाबी पॉप स्टार गुरू रंधावावर कॅनडामधील वैंकूवर येथे एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. गुरू रंधावा कॅनडामध्ये विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कॉन्सर्ट करत होता. वैंकूवरमध्ये रविवारी रात्री त्याचा शेवटचा शो होता. कॉन्सर्ट संपल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

 सूत्रांच्या माहितीनुसार लाइव्ह परफॉर्मन्सवेळी वैंकूवरच्या क्वीन एलिजाबेथ थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीनं मागून येऊन गुरू रंधावाच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. सोशल मीडियावर गायकाचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्यावर हल्ला केलेला पहायला मिळतोय. मात्र नुकतेच रंधावाने इंस्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे. त्याच्या उजव्या भुवयांजवळ मार लागला असून चार टाके पडले आहेत. गुरू रंधावा भारतात परतला आहे.  प्रसिद्ध पंजाबी सिंगर व अॅक्टर प्रीत हरपालने या हल्ल्याबद्दल फेसबुकवर लिहिलं आहे. प्रीत हरपालने पंजाबीत लिहिलं की, मी गुरूला खूप आधीपासून ओळखतो. तो खूप चांगला व्यक्ती आहे. नेहमी दुसऱ्याचा आदर करतो. मात्र ही चुकीची गोष्ट आहे. माहित नाही कसा समाज बनतो आहे.
कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनुसार, ज्या व्यक्तीनं गुरू रंधावावर हल्ला केला तो गायकाच्या परफॉर्मन्सदरम्यान खूप भडकत होता. या घटनेनंतर तिथे पोलीस व अॅम्ब्युलंस पोहचली होती. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणाला अटक केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार हे काम कोणत्यातरी कॅनडात वास्तव्यात असलेल्या भारतीयाचं असेल.


- Advertisement -