Home बातम्या आंतरराष्ट्रीय कॅनडामध्ये विमान वादळात अडकल्याने 37 प्रवासी गंभीर जखमी

कॅनडामध्ये विमान वादळात अडकल्याने 37 प्रवासी गंभीर जखमी

ओटावा : कॅनडाच्या वॅनकुअरवरून ऑस्ट्रेलियाला जाणारे विमान वादळात अडकल्याने यातील प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, एअर कॅनडाच्या विमानाला हा अपघात झाला असून त्याचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी विमानाच्या छताला धडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

एसी33 वॅकुअर सिडनी या बोईंग 777-200 या विमानाला उड्डाण घेतल्यानंतर दोन तासांतच वादळाचा फटका बसला. त्यामुळे विमानाचे होनोलुलुमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. यावेळी विमानात 269 प्रवाशांसह 15 क्रू मेंबर्स होते. या वादळामुळे विमानातील सर्व सामान खाली पडले तर सीट बेल्ट न लावलेले प्रवासी छताच्या दिशेने तरंगत होते त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमान समुद्रसपाटीपासून तब्बल 10 हजार 973 मीटर उंचीवर असताना ही घटना घडली आहे.