Home ताज्या बातम्या कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत!

कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत!

गेल्या काही वर्षांमध्ये उपचाराची शक्यता असूनही कॅन्सर रूग्णांच्या मृत्युमध्ये अडीच पटीने वाढ झाली आहे. याचं कारण त्यांनी कीमोथेरपी आणि सर्जरीसारख्या पारंपारिक उपचारांऐवजी कॅन्सरच्या दुसऱ्या पर्यायी चिकित्सांवर अधिक विश्वास ठेवला.

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात कॅन्सर हा जीवघेणा आजार वेगाने वाढत आहे. एकीकडे संशोधक याच्या चांगल्या उपायांवर शोध करत आहेत, तर दुसरीकडे त्यांना काही गोष्टींची चिंताही सतावत आहे. कॅन्सर तज्ज्ञ कॅन्सरचा उपचार करणाचा दावा करणाऱ्या बाजारातील इतर पर्यायांमुळे चिंतेत आहेत. सोशल मीडियाने त्यांचा फार जास्त प्रचार झाला आहे. त्यामुळेच कॅन्सर पीडितांच्या मृत्युच्या आकडेवारीत अडीच पटीने वाढ झाली आहे. कॅन्सरचे तज्ज्ञ या पर्यायी उपचारांपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत.

वाढतोय कॅन्सरचा विळखा

जगभरात लोक यामुळे हैराण आहेत की, कॅन्सरसारखा आजार वेगाने वाढत आहे. शरीरात अनियंत्रित पेशींची वाढ झाल्याने होणारा हा आजार शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. याच्या आधारावरच वेगवेगळी नावे ठरतात. महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर आहे.

कॅन्सरचा पर्यायी उपचार

कॅन्सरसोबतच कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटचं वाढणंही धोकादायक आहे. अमेरिकी सर्जिकल  ऑन्कोलॉजिस्ट डेविड गोर्सकी स्तन कॅन्सरचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये रिस्पेक्टफुल इनसॉलेंसमध्ये लिहिले की, आपल्या या कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटशी मोठी लढाई करण्याची गरज आहे. हे मार्केट इतकं जास्त पसरलं आहे की, लोक सहजपणे यांच्या जाळ्यात येतात. 

कीमोथेरपी 

डेविड गोर्सकी लिहितात की, मला माहीत आहे की, कीमोथेरपी वाईट आहे. याने व्यक्तीचं जीवन वाईटप्रकारे प्रभावित होतं. पण हाच योग्य उपाय आहे. माझ्या आजूबाजूला असे ८५ टक्के रूग्ण आहेत, ज्यांच्या कॅन्सरची योग्य वेळेवर माहिती मिळवली गेली होती. ते कीमोथेरपी आणि सर्जरीने बरे होऊ शकत होते. पण त्यांनी या उपचाराची निवड न करता पर्यायी चिकित्सेची निवड केली आणि त्यांचा मृत्यू झाला. 

करू नका विश्वास

अ‍ॅक्यूपंचर, आहार परिवर्तन, इतर चिकित्सेमध्येही आतापर्यंत कॅन्सरचा परफेक्ट उपाय शोधला गेला नाहीये. त्यामुळे कॅन्सरच्या नावावर चालू असलेल्या कोणत्याही उपचाराच्या जाळ्यात अडकू नका. कोणत्याही प्रकारची मालिश किंवा डाएट तुम्हाला कॅन्सरपासून बचाव करण्याचा दावा करत असले तरी याने तुमच्यावर उपचार होणार नाही.