Home मनोरंजन कॅन्सरशी लढत आहेत ‘तारक मेहता’ मधील ‘नट्टू काका’ घनश्याम नायक, मुलाने दिली माहिती

कॅन्सरशी लढत आहेत ‘तारक मेहता’ मधील ‘नट्टू काका’ घनश्याम नायक, मुलाने दिली माहिती

0
कॅन्सरशी लढत आहेत ‘तारक मेहता’ मधील ‘नट्टू काका’ घनश्याम नायक, मुलाने दिली माहिती

[ad_1]

मुंबई-तारक मेहता का उल्टा चश्मा‘ या मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेता घनश्याम नायक यांना कर्करोग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घनश्याम नायक यांच्या घशावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यावेळी घशातून आठ गाठी काढण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर घनश्याम नायक बराच काळ अभिनयापासून दूर होते.

केमोथेरपी सुरू केली

आता घनश्याम नायक यांचा मुलगा विकास म्हणाला की त्याच्या वडिलांना कर्करोग झाला असून त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरु केले आहेत. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विकासने सांगितले की एप्रिलमध्ये जेव्हा त्याच्या वडिलांच्या गळ्याची पोझीट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग केले गेले तेव्हा त्यात काही स्पॉट दिसले. घनश्याम नायक यांना त्यावेळी कोणतीही अस्वस्थता वाटत नव्हती, परंतु तरीही त्यांची केमोथेरपी सुरू केली गेली.

Explain- Imdb वर ९.५ रेटिंग मिळूनही ‘The Family 2’ च्या मागे का आहे ‘Scam 1992’? इथे घ्या समजून

‘बाबा आता ठीक आहेत, पुढच्या महिन्यात PET स्कॅन’

घनश्याम नायक यांचा मुलगा विकास पुढे म्हणाला की, ‘आता बाबा बरे आहेत आणि तेच डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत, ज्यांनी त्यांच्यावर याआधीही उपचार केले आहेत. आता पुढच्या महिन्यात घनश्याम नायक यांचे पीईटी स्कॅन केले जाईल, ज्यामुळे घशात असलेले स्पॉट पूर्णपणे गेले की नाही ते स्पष्ट होईल.’

काही दिवसांपूर्वी शूटसाठी दमण आणि गुजरातला गेलेले

त्याचबरोबर घनश्याम नायक यांनी आपल्या प्रकृतीविषयी सांगितले की ते सध्या बरे आहेत. पण केमोथेरपीचे सत्र सुरू केले असून उपचार पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. घनश्याम नायक काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या काही भागाचे चित्रीकरण करण्यासाठी दमण आणि गुजरातला गेले होते. घनश्याम नायक यांनी सांगितले की ते जवळपास चार महिन्यांनंतर चित्रीकरणासाठी गेले होते. सर्वांना भेटून त्यांना खूप आनंद झाला.

करोनामुळे ‘तारक मेहता…’ मधील नट्टू काका झालेत बेरोजगार, म्हणाले- पुन्हा कधी बोलावतील..
नट्टू काका‘ चार महिने घरीच बसले होते

त्याच बरोबर, एप्रिलमध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत घनश्याम नायक यांनी सांगितले होते की, मालिकेचं चित्रीकरण पुन्हा मुंबईला परतण्याची ते वाट पाहत आहेत. जेणेकरून तेदेखील शूटिंग सुरू करू शकतील. महाराष्ट्रातील लॉकडाउननंतर शूटिंग पुन्हा थांबवण्यात आले होते. त्यानंतर बर्‍याच टीव्ही मालिकांनी त्यांचं चित्रीकरण वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतरित केलं होतं.

[ad_2]

Source link