Home बातम्या महत्वाच्या बातम्या कॅन्सल तिकीटांवर रेल्वेची बक्कळ कमाई, माहिती अधिकारात उघड

कॅन्सल तिकीटांवर रेल्वेची बक्कळ कमाई, माहिती अधिकारात उघड

नवी दिल्ली :

आयआरसीटीसीला तिकीट विक्रीतून मोठा नफा मिळतो परंतु तिकीट कॅन्सल केल्यावरही रेल्वेला बक्कळ पैसा मिळत आहे. एका माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार कॅन्सल तिकिटावर रेल्वेला कोट्यवधींचा नफा होत आहे.

मध्य प्रदेशचे एक आरटीआयचे कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रेल्वे मंत्रालयाकडे माहिती अधिकारी माहिती मागवली की कॅन्सल तिकीटांच्या माध्यमातून रेल्वेला किती पैसे मिळाले. यावर मिळालेल्या उत्तरानुसार रेल्वेला कॅन्सल तिकिटातून 1 हजार 518 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा नफा आरक्षित तिकीट कॅन्सल केल्यानंतर झाला आहे. तर अनारक्षित तिकीट कॅन्सल झाल्यामुळे रेल्वेला 18 कोटी 23 लाख रुपयांचा नफा प्राप्त झाला आहे.

तिकीट रद्द केल्यामुळे प्रवाशांकडून जे शुल्क आकारले जाते ते भविष्यात कमी करणार का असा प्रश्नही गौडा यांनी अर्जात विचारला होता. परंतु रेल्वे मंत्रालयाने यावर काहीच भाष्य करण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रश्नाच्या उत्तराचे आपण वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया गौडा यांनी दिली.