Home बातम्या ऐतिहासिक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्यासाठी नागपूरला आगमन – महासंवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्यासाठी नागपूरला आगमन – महासंवाद

0
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्यासाठी नागपूरला आगमन – महासंवाद

नागपूर दि.17 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपूर विमानतळावर महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रात्री पावणे आठ वाजता आगमन झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर फुटाळा तलाव येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फुटाळा तलावावरील जगप्रसिद्ध ‘लाईट ॲन्ड फाऊटन शो ‘चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आनंद घेतला. त्यांच्यासाठी आज हा विशेष ट्रायल शो आयोजित करण्यात आला होता.

            गृहमंत्री अमित शहा विशेष विमानाने गुवाहाटीवरून नागपूरला पोहोचले. पुढील तीन दिवस ते महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज रात्री त्यांचा नागपूर येथे मुक्काम असून उद्या सकाळी पवित्र दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रेशीम बागेतील स्मृती भवन येथे ते भेट देणार आहेत. त्यानंतर लोकमत वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी होणार आहेत.

            आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने,आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, टेकचंद सावरकर,कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्षमी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, माजी खासदार विजय दर्डा, डॉ.विकास महात्मे, अजय संचेती, माजी आमदार परिणय फुके, अरविंद गजभिये, अर्चना डेहनकर, राजू पोतदार, मलिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.