कोल्हापूर, दि २० : भारताचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांचे शुक्रवारला रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. ते कोल्हापूर इचलकरंजीच्या एकदिवशीय दौऱ्यावर आले आहेत. रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्राम गृहावर आहे.
कोल्हापूर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उद्या २० जूनला शनिवारी सकाळी ११ वाजता श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत.

मंदिरातील विकास कामाच्या शुभारंभानंतर पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील परिसराची पाहणी ते करणार आहेत. गेली अनेक शतके भाविकांचे अध्यात्मिक केंद्र असणाऱ्या या मंदिराच्या मूळ वैभवाला पुन्हा उभारण्यासाठी महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मंदिराच्या जगविख्यात किरणोत्सवासाठी पूरक व्यवस्था, सुविधा निर्माण करण्याचीही तरतूद आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने भरीव तरतूद केली आहे.
मंदिर आराखड्यावर चर्चा व पाहणी केल्यानंतर दुपारी ११. ३० च्या सुमारास पोलीस परेड ग्राउंडवरील जाहीर सभेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत.
त्यानंतर दुपारच्या सत्रात ४ वाजताच्या सुमारास इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात ते सहभागी होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास कलाप्पांना आवाडे टेक्सस्टाईल पार्क मैदान इचलकरंजी इथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गृहमंत्री कोल्हापूरवरून मुंबईला प्रस्थान करतील.
00000





















WhatsApp