Home शहरे अहमदनगर केंद्रीय पञकार संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्य अध्यक्ष पदी:नवले

केंद्रीय पञकार संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्य अध्यक्ष पदी:नवले

0

अहमदनगर- केंद्रीय पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्यअध्यक्ष पदी सौंदाळा ता- नेवासा येथील विजय बाबासाहेब नवले यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर व कमलेश शेवाळे जिल्हा अध्यक्ष यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्याांची गुणवत्ता व कार्यक्षमता पाहून हि नियुक्ती केली असून कायदे व नियमांचे सदैव पालन करून संघटनेच्या उद्देशा नुसार पत्रकार जगताच्या हितासाठी सदैव कार्यरत रहाण्यासाठी शुभेच्छा नियुक्ती पत्रात देण्यात आल्या आहेत. राज्यभर तळागाळात फिरून ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून हाती घेऊन केंद्र व राज्य पातळीवर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करण्याची भूमिका हि संघटना करत असते. विजय नवले यांचा पत्रकारीतेचा भरगच्च अनुभव आणि त्यांनी अत्यल्पावधीत मिळवलेले यश आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारा बरोबरच शेती, उद्योग, विकास तसेच पत्रकारीता यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.  विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था यांच्या प्रश्नांवरही ते सजग राहून शासन दरबारी आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे .