Home ताज्या बातम्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रुपये दिले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रुपये दिले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रुपये दिले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई- शफीक शेख
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली. यावेळी फडणवीसांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली त्याची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने करोना काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही, असा राज्य सरकारने केला होता. आत्तापर्यंत २८ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत. मात्र केंद्राने काहीही दिलेच नाही असं ठाकरे सरकारकडून भासवलं जातं आहे, असा आरोप फडणवीसांनी केलाय.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या, प्रत्येक ट्रेनमागे 50 लाख केंद्राला खर्च, राज्याने केवळ तिकिटाचे सात ते नऊ लाख खर्च केलेत, असं फडणवीसांनी सांगितलं आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांनाही सरकारनं भरीव मदत केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ‘श्रमिक रेल्वे गाड्यांवर ३०० कोटींचा खर्च झाला आहे. मजुरांच्या छावण्या, त्यांचं अन्नधान्य यासाठी केंद्रानंच एसडीआरएफच्या माध्यमातून १ हजार ६११ कोटी रुपये दिले. गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत अन्नधान्य वितरण (गहू, तांदूळ, डाळ), स्थलांतरित मजुरांना जेवण आणि नाश्ता यावर केंद्राने आतापर्यंत ४५९२ कोटी रुपये राज्याला दिले. पीएम किसान योजना, जनधन योजना, विधवा, परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक, उज्जवल गॅससाठी केंद्राने राज्यात १६२५ कोटी रुपये खर्च केले. त्याशिवाय नोव्हेंबरपर्यंतचा जीएसटीचा निधीही महाराष्ट्राला दिला आहे.