Home शहरे अहमदनगर केके रेंज सरावातील निकामी बॉम्ब हाताळताना स्फोट, एक ठार

केके रेंज सरावातील निकामी बॉम्ब हाताळताना स्फोट, एक ठार

0

अहमदनगर : केके रेंज सरावातील निकामी बॉम्ब हाताळताना स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा निकामी बॉम्ब भंगार समजून हाताळताना ही घटना घडली. या स्फोटामध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर जवळील खारे कर्जुने येथे ही घटना घडली. चोरून आणलेल्या लष्कराच्या निकामी बॉम्बचे भंगार हाताळताना हा प्रकार घडला. भिवा सहादू गायकवाड (वय 55) असे मयताचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.