मुंबई :‘
केदारनाथ’ या चित्रपटातून अभिनेत्री सारा अली खाननं अभिनयात पदार्पण केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाई केली आणि सारा तसेच सुशांतसिंह राजपूत या जोडीनं साकारलेल्या भूमिकांचं कौतुकही झालं. कधीकाळी साराचा हा निर्णय चुकीचा की बरोबर याची चर्चा रंगली होती.
सारानं काही दिवसांपूर्वी सुशांतच्या आठवणींची पोस्ट शेअर केली होती. यात ती म्हणते, ‘हा चित्रपट मी कधीच विसरू शकत नाही. या चित्रपटादरम्यान आपली भेट झाली आणि अभिनय काय असतो, हे तू मला शिकवलंस. मी जेव्हा जेव्हा अडचणीत आले, तेव्हा माझ्या मदतीसाठी तू तिथं होतास. स्वप्न खरी होऊ शकतात हे तुझ्यामुळेच मला कळलं. आज तू सभोवती नाहीस हे खरं वाटत नाही; मात्र जेव्हा जेव्हा आकाशात तारे दिसतात, सूर्योदय होताना किंवा आकाशातला चंद्र मी पाहते, तेव्हा तेव्हा इथंच आहेस याची मला खात्री पटते.’
कोण खरं कोण खोट? रियाच्या आरोपांवर नितीश भारद्वाज यांचा खुलासा; म्हणाले सुशांत आणि साराला कधीही…
सुशांत आणि सारामध्ये नक्की काय नातं होतं? मित्रानं केला धक्कादाक खुलासा
या पोस्टनंतर सारानं हा चित्रपट करण्याचा निर्णय कसा योग्य होता त्यावर भाष्य केलं आहे. ती म्हणते, ‘जेव्हा मनापासून एखादी गोष्ट तुम्ही करता, तेव्हा ती उत्तमच होणार याची खात्री पटते. मला जे मनापासून वाटतं, तेच मी करावं अशी माझ्या पालकांची इच्छा होती. हा चित्रपट केल्यानंतर जे कौतुक वाट्याला आलं, ते पाहता हा निर्णय योग्यच होता.’
प्रसिद्ध अभिनेता करण मेहरा याला अटक, पत्नी निशाला मारहाण केल्याचा आरोप
Source link