Home गुन्हा कोंढवा पोलिसांनी एकूण ५४ मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिताफीने पकडले

कोंढवा पोलिसांनी एकूण ५४ मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिताफीने पकडले

0

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

पुणे :- कोंढवा पोलिसांनी एकूण ५४ मोबाईल
चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिताफीने पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ जून रोजी कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रगटीकारण शाखेचे अधिकारी व अंमलदार गस्त घालीत असताना पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना मोबाईल चोरीमध्ये सक्रीय सहभाग असलेला इसम कोंढवा कमेला येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, प्रगटीकरण शाखा, कोंढवा पोलीस ठाणे यांनी कमेला चौक, कोंढवा खुर्द येथे सापळा रचला. तेथे त्यांना एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. तो पोलीस पथकास पाहून भेदरला व पळून जाऊ लागताच त्यास पोलीस उपनिरीक्षक शिंदे व त्यांच्या पथकाने पकडले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव येडप्प्पा हिरेकरू,
वय-२५, रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे. मूळ रा. हुबळी असे
सांगितले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे साधे व अॅन्ड्रॉईड असे एकूण ५४ मोबाईल मिळून आले. त्यांची अंदाजे किंमत ५,४७,६६९/- रु. अशी आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक
विभाग, पुणे शहर, यांच्या सूचनांप्रमाणे परिमंडळ- चे पोलीस उपायुक्त
सुहास बावचे, वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वपोनि विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोनि गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोउनि शिंदे, सपोफौ इक्बाल शेख, पोह योगेश कुंभार, पोना कौस्तुभ जाधव, गणेश आगम, सुशील धिवार, पोशि दीपक क्षीरसागर, अझीम शेख, उमाकांत स्वामी व मोहन मिसाळ यांनी केली आहे.