Home गुन्हा कोंढवा पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केली अटक

कोंढवा पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केली अटक

0


परवेज शेख सोमवार दि.१७ रोजी रात्री १०.४५ वा.सुमारास दोन अज्ञात आरोपींनी फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून त्यांची वॅगनर कार नंबर एम. एच. १२ एम. आर. २३८६ ही बिटाँस हाँटेल समोरून जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्यादीनुसार कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १६७/२०२० भा.द.वि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास पथकाचे मा.सहा.पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे, पोलीस शिपाई श्री.जोतिबा पवार यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होताच त्याचा शोध घेत असतांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हा कृष्णानगर स्मशानभूमीजवळ मोहम्मदवाडी याठिकाणी असल्याची माहिती मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड व मा.पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे

मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याठिकाणी सापळा रचून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल नानासाहेब आव्हाड (वय 19, रा.कृष्णानगर,मोहम्मदवाडी,पुणे) याला ताब्यात घेत त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार शाहरुख शौकत खान (वय 25, रा.वडारी वस्ती, मोहम्मद वाडी,पुणे) याच्यासह केल्याचे सांगितल्याने त्या दोघानां ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना नमूद दाखल गुन्ह्यात दि.१८ रोजी अटक करून पुढील तपास केला असता. अटक केलेल्या आरोपीनी १) गु.र.क्र.९९/२०२० भादवी ३७९, २) गु.र.क्र.१२०/२०२० भादवि कलम – ३७९, ३) गु.र.क्र.१५५/२०२० भादवी कलम – ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेला चाकु, १ वेगनार कार, १ रिक्षा, २ मोटर सायकली असे एकूण १ लाख ६० हजार ३२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी,मा.अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार, कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे मा.सहा.पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे, पोलीस हवलदार श्री.सुरेश भापकर, पोलीस हवालदार श्री.संतोष नाईक, पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे, पोलीस नाईक श्री.संजीव कळंबे, पोलीस नाईक श्री.निलेश वनवे, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस नाईक श्री.सुशील धिवार, पोलीस शिपाई श्री.ज्योतिबा पवार, पोलीस शिपाई श्री.उमेश शेलार, पोलीस शिपाई श्री.किशोर वळे, पोलीस शिपाई श्री.आदर्श चव्हाण यांच्या पथकाने केलेली आहे.