कोंढवा पोलीस स्टेशनची कामगिरी ५०,०००/-रुपये किंमतीचा अँपे प्यागो कंपनीचा माल वाहतूक टेम्पो चोरी गेल्या

- Advertisement -

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख
कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यात ५०,०००/-रुपये किंमतीचा अँपे प्यागो कंपनीचा माल वाहतूक टेम्पो चोरी गेल्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल होता. दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला टेम्पो व आरोपी हा येवलेवाडी भागात असल्याबाबत पोलीस शिपाई किशोर वळे व पो.शि. आदर्श चव्हाण यांना त्याच्या बातमीदार याचे कडुन मिळालेल्या माहितीवरून आम्ही स्वतः व तपास पथकातील अंमलदार पो.हवा. संतोष नाईक पो.ना. निलेश वनवे, संजीव कळंबे,पो. शि. जोतिबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे यांनी येवलेवाडी भागात सापळा रचून आरोपी सुरज विलास कुंभार वय २८ वर्ष रा.येवलेवाडी, पुणे यास चोरीस गेलेल्या ५०,०००/-रुपये किंमतीच्या टेम्पोसह पळून जात असताना शिताफिने पाठलाग करून पकडून सदरचा गुन्हा उघड केला आहे.


सदरची कामगिरी मा. श्री.सुनील फुलारी सो, अप्पर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर , मा.श्री सुहास बावचे सो,पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, मा.श्री.सुनील कलगुटकर सो, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे, मा.श्री. विनायक गायकवाड सो.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे, श्री. महादेव कुंभार सो.पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे सहा .पो नि.चेतन मोरे, पो हवा. संतोष नाईक ,पो.ना. निलेश वणवे, पो.ना.संजीव कळंबे, पो.ना.सुशिल धिवार, पो.शि.जोतिबा पवार, पो.शि.किशोर वळे यांच्या पथकाने केली आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.darshanpolicetime.com| आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामटूमबलर |लीन्केडीन | युट्यूब Copyright ©DarshanPoliceTime.Com | All rights reserved.

- Advertisement -