Home ताज्या बातम्या कोंढवा येथे गगन अॅमराॅल्ड को-ऑप हाऊसिंग सोसायटी येथे रमजान ईद च्या निमित्ताने सोसायटी तर्फे फुलांच्या वर्षांवाने उत्स्फूर्तपणे स्वागत

कोंढवा येथे गगन अॅमराॅल्ड को-ऑप हाऊसिंग सोसायटी येथे रमजान ईद च्या निमित्ताने सोसायटी तर्फे फुलांच्या वर्षांवाने उत्स्फूर्तपणे स्वागत

0

पुणे : कोंढवा येथे गगन एमराॅल्ड सोसायटी मध्ये भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीनं कृतज्ञतेच्या भावनेतून फुलांच्या वर्षांवाने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. कोरोनावर मात करण्यासाठी आपली पुणे महापालिका, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनासह विविध घटक अहोरात्र काम करत आहेत. संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक घटकाचा हा सन्मान असून या संकटकाळात हे स्वागत सर्वांचेच मनोबल उंचावणारे आहे.

नगरसेवक अॅड. हाजी गफुर पठाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, वानवडी-रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुंजन जाधव, महादेव कुंभार, सतिश शिंदे यांच्यासह परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.