कोंढव्यात सराईत गुन्हेगारांच्या घरात घुसून कोयत्याने वार

- Advertisement -

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

पुणे – पुण्यात टोळक्यांनी चक्क एका अट्टल गुन्हेगारावर कोयत्याने सपासप वार करून ठार केले. ही थरारक घटना पुण्यात घडली असून पप्पू पडवळ असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा पुण्यातील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते. या हत्येआधीही त्याच्यावर टोळीकडून हल्ला करण्यात आला होता. तसेच, फायरींगही करण्यात आली होती. मात्र आजच्या हल्ल्यात त्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अज्ञात टोळक्याने घरात घुसून पप्पू पडवळवर कोयत्याने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, त्याचा चेहरा सुद्धा ओळखू येत नव्हता. एवढंच नाहीतर, त्याचा एक हात कोयत्याच्या हल्ल्यामुळे छाटला गेला. घरात रक्ताचा सडा पडला होता. पप्पू पडवळने जीव सोडल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.पप्पू पडवळ आधी एक कार चालक होता. त्यानंतर त्याने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचे काही जणांसोबत पैशांवरुन वादही होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

- Advertisement -