पत्रकार परिषदेत टेबलावर कोका कोलाची बाटली ठेवण्यात आली होती. ही गोष्टी रोनाल्डोला आवडली नाही. त्याने कोका कोलाची बाटली बाजूला केली आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या ऐवजी पाणी देण्यास सांगितले.
या पत्रकार परिषदेला पोर्तुगाल संघाचे व्यवस्थापक फर्नांडो देखील उपस्थित होते. अर्थात फर्नांडो यांनी टेबलावरील कोका कोलाची बाटली हटवली नाही. पण रोनाल्डोने केलेल्या कृतीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
वाचा- WTC Final: ऐतिहासिक लढती आधीच न्यूझीलंड बॅकफूटवर; म्हणाले, भारताचा आव्हान…
युरो २०२० या स्पर्धेचा कोका कोला अधिकृत स्पॉन्सर आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की पाच वेळा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळवणाऱ्या या खेळाडूवर काही कारवाई होते का.
वाचा- दुखापतीनंतर फाफला स्मृतीभ्रंश; सोशल मीडियावरून दिली माहिती
गतविजेत्या पोर्तुगालने पहिल्या लढतीत हंगेरीचा पराभव केला. या सामन्यात पोर्तुगालने ३-०ने विजय मिळवला यात रोनाल्डोने २ गोल गेले. सामन्याच्या आधी पत्रकार परिषदेत रोनाल्डोने युवेंटस क्लब सोडून मॅनचेस्टर युनायटेड क्लबमध्ये जाण्याचे वृत्त फेटाळून लावले. पाच युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धा खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
कोका कोलाचे झाले नुकसान
रोनाल्डोचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोका कोला कंपनीचे मोठे नुकसान झाले. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कोकचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले. त्याची किमत २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलरवर आली. भारतीय रुपयात त्यांना २९ हजार ३०० कोटींचे नुकसान झाले.