Home अश्रेणीबद्ध कोटयावधी रुपयांचा गंडा घालणा-या एटीजी ग्रुप ऑफ कंपनी व एटीजी मिडियाचे संचालक आरोपीस अटक

कोटयावधी रुपयांचा गंडा घालणा-या एटीजी ग्रुप ऑफ कंपनी व एटीजी मिडियाचे संचालक आरोपीस अटक

पुणे: अलंकार पोलीस स्टेशन गुन्हयातील आरोपी  एटीजी ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर १) अरविंद मणिराम तिवारी, रा. कमला हेजिटेट, बी ७०१, अवधुत सोसायटी, सुंदर नगर, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई ४००९८ २) दुर्गेश संतोष शुक्ला, रा. कमला हेजिटेट, बी ७०१, अवधुत सोसायटी, सुंदर नगर, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई ४००९८ यांना दि. १३ जुलै रोजी ४.४१ वा अटक केली आहे. एटीजी ग्रुप ऑफ कंपनी व एटीजी मिडिया यांचे मॅनेजिंग डायरेक्टर्स अरंविद तिवारी, डायरेक्टर गितीका तिवारी, दुर्गेश शुक्ला व करन खन्ना यांनी आपापसात कट कारस्थान रचुन फिर्यादी यांच्या नार्थ दिशा इक्रा प्रा. लि. पुणे कंपनीस परदेशी बँकाकडून कमी व्याज दराने ४५ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवुन त्यासाठी परदेशी बँकेस कर्ज रक्कमेच्या ४ टक्के हायजींग चार्जेस म्हणुन भरण्यासाठी बनावट करारनामा तयार करुन त्याची प्रत फिर्यादीस न देता फिर्यादी यांना २,०२,००,०००/ रु देण्यास भाग पाडले आणि कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध करुन न देता फिर्यादी यांची फसवणुक केलेली आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री. डॉ. के. व्यंकटेशम् साो, पुणे शहर., मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. मोराळे सो, मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री. संभाजी कदम सो, व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री. निलेश मोरे सो, यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युनूस शेख, पो. हवा. निलेश पाटील, पो.हवा. विकास कोळी, म.पो. शि. सपना म्याना यांनी केलेली आहे.