Home मनोरंजन कोट्यवधींच्या कर्जामुळे बिग बींच्या घरी येऊन शिव्या आणि धमक्या द्यायचे देणगीदार, एके दिवशी…

कोट्यवधींच्या कर्जामुळे बिग बींच्या घरी येऊन शिव्या आणि धमक्या द्यायचे देणगीदार, एके दिवशी…

0
कोट्यवधींच्या कर्जामुळे बिग बींच्या घरी येऊन शिव्या आणि धमक्या द्यायचे देणगीदार, एके दिवशी…

[ad_1]

हायलाइट्स:

  • कर्ज फेडण्यासाठी देणगीदारांच्या जाहिरातींमध्ये मोफत काम करायचे बिग बी
  • बिग बींच्या अंगावर होतं तब्बल ९० कोटींचं कर्ज
  • ‘चेहरे’, ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार अमिताभ बच्चन

मुंबई– बॉलिवूडचे महानायक म्हणवले जाणारे अमिताभ बच्चन आज कोट्यावधी रुपयांचे मालक आहेत. आलिशान बंगले, महागड्या गाड्या, उंची राहणीमान असणारे बिग बी कधीकाळी दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर होते. आज अमिताभ ७८ वर्षांचे आहेत. परंतु, त्यांच्या लोकप्रियतेला आजवर कोणीही टक्कर देऊ शकलेलं नाही. ७० आणि ८० च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अमिताभ ९० च्या दशकात मात्र अनेक अडचणींचा सामना करत होते. अमिताभ यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एकीकडे अमिताभ यांना चित्रपट मिळत नव्हते तर दुसरीकडे त्यांच्यावर असणारं कर्ज वाढत होतं.

आराध्याचा धम्माल डान्स व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना झाली ऐश्वर्याची आठवण

घरी येऊन शिव्या द्यायचे देणगीदार

एका मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांच्या बिकट परिस्थितीवर भाष्य करत खरी परिस्थिती सांगितली होती. अमिताभ यांनी म्हटलं होतं की, १९९९ साली अमिताभ यांची कंपनी (ABCL) अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. ही कंपनी चित्रपट निर्मिती, वितरण आणि इव्हेंट मॅनेजमेन्टचं काम करायची. कंपनीवर प्रचंड कर्ज झालं होतं. अमिताभ यांच्यावर तब्बल ९० कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं. अमिताभ यांनी देणगीदारांबद्दल बोलताना म्हटलं, ‘मी ते कधीही विसरू शकत नाही की, कसे देणगीदार आमच्या घरी यायचे. शिव्या आणि धमक्या देऊन निघून जायचे. त्याहूनही वाईट होतं जेव्हा देणगीदार ‘प्रतीक्षा’ बंगल्याची पाहणी करायला आले जणू आम्ही तो विकणार आहोत.’


मी काय करू शकतो या विचारात होते अमिताभ

अमिताभ यांनी म्हटलं, ‘तो माझ्या ४४ वर्षाच्या करिअरमधला सगळ्यात वाईट काळ होता. मी हतबल झालो होतो. मी बसून विचार करू लागलो होतो की यातून बाहेर कसं पडता येईल. उत्तर मिळालं की, मला अभिनय येतो. त्यानंतर एके दिवशी मी माझ्या घराच्या मागे राहणाऱ्या यश चोप्रा यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडे मी चित्रपटाची मागणी केली. त्यांनी लगेच मला ‘मोहब्बते’ सारखा मोठा चित्रपट देऊ केला. चित्रपट हिट झाला. त्यानंतर दिवस बदलले.’ त्यानंतर अमिताभ यांनी ‘कोन बनेगा करोडपती’ मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. अमिताभ यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ होत गेली. त्यानंतर अमिताभ यांनी ‘कभी खुशी कभी गम’, ‘आंखें’, ‘बागबान’, ‘खाकी’, ‘देव’, ‘लक्ष्य’, ‘वीर-जारा’, ‘बंटी और बबली’, ‘चीनी कम’, ‘भूत नाथ’, ‘सरकार’, ‘पा’, ‘पीकू’, ‘पिंक’ आणि ‘गुलाबो सिताबो’ सारख्या होत चित्रपटात काम केलं.

फाईव्ह जी नेटवर्क जुही चावलाला दिलासा नाहीच; दंड रद्द करण्यासाठी पुन्हा याचिका



[ad_2]

Source link