आयुष्मान खुराना
आयुष्मान खुरानानं त्याच्या इन्स्टाग्रामवर वडिलांचा एक फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्यानं लिहिलं, ‘लहान असताना बाबांनी घालून दिलेले नियम मोडताना मजा येत असे. पण आता मोठं झाल्यानंतर स्वतःचे नियम मोडता येत नाहीत. ही शिस्त आम्हाला त्यांच्यामुळेच लागली. ते शिस्त, संगीत, कविता, चित्रपट आणि कलेचे प्रेमी होते. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला तरीही त्यांना जोतिष्यशास्त्र आवडत असे. त्यामुळेच माझ्या नावात दोन वेळा N आणि R ही अक्षरं येतात.’
अनिल कपूर
अभिनेता अनिल कपूर यांनीही आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत त्यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, ‘प्रामाणिक, दयाळू आणि चांगला मित्र या सर्व गोष्टी मी माझ्या आयुष्यात शिकलो. पण ते माझ्या बाबांकडून मिळालेलं गिफ्ट आहे. त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं ज्यामुळे मी माझ्याच चुकांमधून शिकत गेलो. पण या सर्वात मला माहीत होतं की ते नेहमीच माझ्यासोबत असतील. आज मी जे काही आहे किंवा माझ्याकडे जे काही आहे. हे सर्व त्यांच्यामुळेच आहे.’
करिना कपूर
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आज फादर्स डेच्या निमित्तानं करिनानं वडील रणधीर कपूर आणि पती सैफ अली खान यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये करिनानं या दोघांनाही ‘सुपरहिरो’ म्हटलं आहे. करिनानं हटके पद्धतीनं वडील आणि सैफला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मानं तिच्या बाबांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि सोबतच विराट कोहलीचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘माझ्या आयुष्यातील दोन सर्वात आदर्श पुरुष. प्रेमळ आणि दयाळू. मुलींकडे असलेले सर्वोत्तम वडील.’
अभिनेता अक्षय कुमारनं सुद्धा फादर्स डेच्या निमित्तानं एक कोलाज फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो त्याचे वडील आणि त्याच्या दोन्ही मुलांसोबत दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्षयनं लिहिलं, ‘माझ्या बाबांनी मला प्रेम आणि शहाणपणा याचा महासागर दिला. त्यातील काही थेंब मी माझ्या मुलांना देऊ शकलो याचं मला समाधान वाटतं.’
रिया चक्रवर्ती
मागच्या वर्षभरापासून सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं फादर्स डे निमित्त वडिलांना शुभेच्छा दिते त्यांची माफी मागितली आहे. तिनं तिच्या बालपणीची फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘बाबा तुम्हाला फादर्स डेच्या शुभेच्छा! तुम्ही माझी सहनशक्ती आहे. माझी प्रेरणा आहे. मला दुःख आहे की, मागचा काही काळ तुमच्यासाठी खूपच कठीण गेला आहे. पण तुमची मुलगी असल्याचा मला अभिमान वाटतो. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.’
काजोल
अभिनेत्री कजोलनं फादर्स डेच्या निमित्तानं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘या सर्वांनीच मला प्रेम, आदर आणि पाठिंबा दिला. हे सर्व माझ्या कोड्यातील हरवलेले तुकडे आहेत जे माझं आयुष्य पूर्ण करतात.’