कोण केला प्रकाश खळदकर यांचा खून?

- Advertisement -

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ८जुलै : खरेदी केलेल्या जागेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या लोकांसोबत झालेल्या वादात एकाच खून झाला आहे. उस्मानाबाद येथील समर्थ नगर भागात मंगळवारी ७ जुलै रोजी दुपारी ही घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालयाच्या अगदी जवळच पाठीमागे दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने लोकांत भीतीने घर केले आहे.

रघुनाथ खळदकर यांनी समर्थनगर येथील आपल्या मालकीचा प्लॉट व गाळ्याची जागा तेर येथील दिपक जोतीराम भातमांगे यांना विकली होती. मंगळवारी दिपक भातमांगेसह त्यांची आई व अन्य दोन महिला असे चौघे खरेदी केलेल्या जागेचा ताबा घेण्याकरीता त्या ठिकाणी राहत असलेल्या भाडेकरुचे सामान बाहेर टाकू लागले. यावर रघुनाथ खळदकर यांचा मुलगा प्रकाश, सुन प्रज्ञा या दोघांनी सामान फेकून देण्यास अडवनूक केली. तेंव्हा चौघांनी प्रकाश खळदकर, (वय ४८ वर्षे) व प्रज्ञा यांना धक्काबुक्की करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रकाश यांना फरशीवर ढकलून दिले. यात प्रकाश खळदकर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. प्रज्ञा खळदकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दंसं. कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -