हायलाइट्स:
- नितीश यांना जाणवला नाही सुशांतच्या वागण्यात बदल
- सुशांत आणि सारा नेहमीच सामान्य व्यक्तीप्रमाणे होते
- सुशांत चपळ आणि वैचारिक वागत असे- नितीश भारद्वाज
NCB च्या चौकशीत रिया चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा; सुशांत त्याच्या बहिणींसोबत.
रियाने एनसीबीला दिलेल्या जबाबात तिने सुशांतसोबत अभिनेत्री सारा अली खानवरही आरोप केले होते. साराने सुशांतला गांजा आणि वोडका ऑफर केल्याचं रियाने म्हटलं होतं. याप्रकरणी जेव्हा साराची चौकशी करण्यात आली तेव्हा साराने सुशांत अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं कबुल केलं होतं. याप्रकरणावर नितीश यांनीही त्यांचं मत मांडलं आहे. नितीश यांनी सुशांत आणि सारासोबत ‘केदारनाथ’ चित्रपटात काम केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नितीश यांनी म्हटलं, ‘सुशांत सिगारेट प्यायचा पण तो खूप चपळ होता. जर तो कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन करत असता. तर तो इतका चपळ राहू शकला नसता. त्याचं डोकं भन्नाट चालायचं. मी स्वतः सिगारेट, दारू पीत नसलो तरी एखाद्या सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीला ओळखू शकतो. त्यांच्याजवळ जाताच आपल्याला एक वेगळ्याच वास येतो. ‘
मी सुशांत आणि सारासोबत प्रवास केलाय पण मला ते दोघेही कधीच नशेत दिसले नाहीत. किंवा त्यांचे डोळेही मला कधीच धुंदीत दिसले नाहीत. ते नेहमी एखाद्या सध्या व्यक्तीप्रमाणेच असायचे. सुशांत तर एका वेगळ्याच जगात असायचा. तो नेहमी ग्रह, तारे यांबद्दल बोलायचा. मला असं कधीच वाटलं नाही की सुशांतला कोणत्या गोष्टीचा ताण आहे. तो नेहमी हसतमुख असायचा. त्याने मला घरी देखील बोलावलं होतं. तेही अनेकदा.’
मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत रिया चक्रवर्ती पहिल्या स्थानावर