Home गुन्हा कोथरूड मध्ये भरदिवस सराफी दुकानावर दरोडा

कोथरूड मध्ये भरदिवस सराफी दुकानावर दरोडा

0

पुणे : परवेज शेख दि 24/11/2019 :- पुणे कोथरूड मध्ये भरदिवस सराफी दुकानावर दरोडा धक्कादायक घटना घडली आहे.दरोडेखोरांनी येथुन लाखो रुपयांचे दागिने नेले आहेत.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.कोथरूड परिसरात आंनदनगर भागात मुख्य चौकात पेठे जेवलर्स दुकान आहे. ४ वाजून ३५ मिनिटांनी दोघे .दरोडेखोर दुकानात घुसले. त्यांनी कंबरेला लावलेले पिस्तुल बाहेर काढून दुकानातील मालक आणि कामगारांना धमकावत दुकान लुटण्यास सुरवात केली. कामगारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता एकाने पिस्तूलमधून हवेत एक गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळीही झाडण्यात आली.दोघांनी येथून लाखो रुपयांचे दागिने.दरोडेखोरांनी चोरून नेले आहेत..दरोडेखोरांनी तेथून दुचाकीने चांदणी चौकाच्या दिशेने पसार झाले. आहे कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पोलिसांनी दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे .