Home गुन्हा कोपरगाव, सिन्नर शहरातून चोरी केलेल्या व जळगाव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या मोटार सायकल पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोपरगाव, सिन्नर शहरातून चोरी केलेल्या व जळगाव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या मोटार सायकल पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0

पुणे : परवेज शेख

चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा तपास करीत असताना, गुप्त माहितीच्या आधारे चोराचा शोध लागला आहे. कोपरगाव, सिन्नर शहरातून चोरी केलेल्या व जळगाव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या अट्टल मोटारसायकल चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून विविध ठिकाणी विक्री केलेल्या १२ नव्या कोर्‍या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. तसेच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारालादेखील औरंगाबाद शहर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून हिंमतराव सोनावणे यांची २० हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची प्लाटिना मोटारसायकल जुलै महिन्यात चोरीला गेली होती.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बुधवारी विकास देविदास राठोड या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच साथीदार व मुख्य सूत्रधार मनोजसह विकासाने मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी विकास राठोड याने चोरी केलेल्या १२ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. यात दोन होंडा शाईन, दोन सी.डी.डिलक्स, एक ग्लॅमर एफटी, दोन होंडा युनिकॉन, एक फॅशन प्रो, एक टीव्हीएस स्टॉर, एक ड्रिम युवा आदी मोटारसायकल आहेत. या सर्व मोटारसायकल त्याने आखतवाडे, ता.पाचोरा, मोहळाई, वरसेडा ता.सायगाव येथे पैसे घेवून गहाण ठेवलेल्या होत्या. दरम्यान, पुढील तपास पोलीस करीत आहेत.