कोपर्डीतील नराधमांना तातडीने फाशी द्या व मराठा आरक्षण साठी बलीदान दिलेल्या ४२ बांधवांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या छावा क्रांतिवीर सेनेची मागणी

- Advertisement -

अहमदनगर : ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उटला त्या कोपर्डीच्या घटनेला ३ वर्षे उलटून गेली या नराधमांच्या कृरकृत्याच्या विरोधात संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरून त्या नराधमांना फाशी ची शिक्षा व्हावी ही मागणी लावून धरल्यानंतर त्या नराधमांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली हि शिक्षा २ वर्षे होत आले आहे. तरी त्या शिक्षेची अंमलबजावणी होताना दिसत नाही.तरी त्या नराधमांची फाशीची शिक्षाची तारीख ३० आॅगस्ट पर्यंत ठरवून त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी.व जे ४२ मराठा बांधवांनी आपले बलिदान दिले त्याच्या कुटूंबियांना आर्थिक मदत म्हणुन प्रत्येकी १० लाख रू.त्वरीत द्यावे नाही तर छावा क्रांतिवीर सेना तिव्र आंदोलन करेल असे निवेदन तलशिल दार साहेब नेवासा यांना देण्यात आले. या वेळी छावा क्रांतिवीर सेना नेवासा तालुका व मराठा टायगर छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले पाटील, विशाल तुपे, तालुका संघटक पप्पू बोधक,रोहीत गडाख,गणेश घोडके सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -