Home ताज्या बातम्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी भारतीय वैद्यकशास्त्रातील औषधांचा उपयोग करण्याचा आयुष मंत्रालयाचा सल्ला

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी भारतीय वैद्यकशास्त्रातील औषधांचा उपयोग करण्याचा आयुष मंत्रालयाचा सल्ला

उस्मानाबाद : शीतलकुमार शिंदे ,

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुर्वेद, युनानी, सिद्धी आणि होमिओपॅथी या भारतीय मुळातील वैद्यकशास्त्रांच्या औषधींचा वापर करण्याचा सल्ला भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिला आहे. त्यावरून भारत सरकारच्या मध्य रेल्वे, न्यूक्लिअर कॉर्पोरेशन आदी विविध विभागातील मानव संसाधन विभागांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना या औषधींचा उपयोग करण्याच्या सूचना दिल्या अहेत. यानुसार यापैकी कुठल्या वैद्यक शाखेचे कोणते औषध कसे द्यावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या मानव संसाधन विभागाचे उप महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या या सल्ल्याला अधोरेखित करून २१ मार्च रोजी  एक आदेशच जारी केला आहे. त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा म्हणूनहोमिओपॅथीची औषधे कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथमोपचार केंद्रातून देण्यासाठी हा आदेश आहे. त्यात ही औषधे कुठे, केंव्हा आणि कशी देण्यात यावीत याचा सविस्तर उल्लेख आहे.
दरम्यान मध्य रेल्वेच्या पर्सनल विभागाच्या को चेअरपर्सन विनिता वर्मा यांनीही रेल्वे कर्मचाऱ्यांना आयुष मंत्रालयाच्या या आदेशच उपयोग व्हावा म्हणून २९ मार्च रोजी अशाच प्रकारचा एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या भायखळा, कल्याण, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथील दवाखान्यातून होमिओपॅथी औषधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्याचे स्पष्ट केले आहे. या आदेशातही कुठल्या वैद्यक शाखेची, कोणती औषधे किती प्रमाणात द्यावी हेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारतीय आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीसह आयुर्वेद, युनानी या भारतीय वैद्यकशास्त्रांच्या ठराविक औषधींचा उपयोग प्रतिबंधक उपाय म्हणून करावा असे सुचविले आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने या विषयाला पुरेशी प्रसिद्धीही दिलीं असून भारतीय न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आणि मध्य रेल्वेने याचाच आधार घेऊन हे आदेश काढले आहेत. 
दरम्यान मध्य रेल्वेचे दवाखाने आणि पर्सनल विभाग येथे संपर्क करून पडताळणी केली असता, मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या नोडल अधिकारी डॉ. अनिता जयस्वाल यांनी आयुष मंत्रालयाने संशोधनाअंती होमिओपॅथी औषधींचा उपयोग कोरोना प्रतिबंधक म्हणून करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसारच हे आदेश आणि त्यावरील कार्यवाही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत होमिओपॅथी या वैद्यक शाखेचे डॉ. अमोल गावडे यांनी याबाबतचा सरकारी पत्रव्यवहार दाखवून दिला. यानंतर पडताळणीत आयुष मंत्रालयाने आशा शिफारशी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी यांचेशी संपर्क केला. भारतीय आयुष मंत्रालयानेही सविस्तर माहिती दिली आहे. तिचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार होमिओपॅथी मधील आर्सेनिक अल्बम ३० या औषधींचा अनोशपोटी तीन दिवस उपयोग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयुर्वेदानुसार शडांग पनिया या प्रक्रियेने बनवलेला काढा एका बादलीत भरून ठेवावा आणि तहान लागल्यावर प्यावा. दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यातून अगस्त्य हरितीका घ्यावी. हे रोग प्रतिबंधक उपाय सुचवले आहेत. युनानी पद्धतीचीही औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.