Home ताज्या बातम्या कोरोनाची कोणती ही भीती न बाळकता पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांना मदत- पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे मुंबई

कोरोनाची कोणती ही भीती न बाळकता पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांना मदत- पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे मुंबई

दर्शन पोलिस टाइम लाईव्ह टीम:- परवेज शेख

मुंबई : पोलिस बॉइज असोसिशनचे स्वयंसेवक रेड झोन मध्ये पोलिस स्टेशन येथे कोरोनाची कोणती ही भीती न बाळकता पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांना मदत करत आहेत. यातीलच एक भाग म्हणून मुंबई – ठाणे परिसरातील पोलीस स्टेशनचे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक रवि वैद्य व सिद्धार्थ डी जाधव – प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या सुचनेनुसार धीरज पारसेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,श्री सुशील मोरे निवड समिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा श्री अमोल माने प्रदेश अध्यक्ष मुंबई ,श्री अमोल पटेकर सरचिणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई , नवी मुंबई , ठाणे येथे गेल्या दोन चार दिवसांपासून संपूर्ण पोलिस स्टेशन हे सॅनिटायझर करण्यात येत आहे तसेच नेहमीप्रमाणे पालघर जिल्हा येथे सुद्धा अन्नदान व इतर आरोग्याच्या सुविधाचे किट ,अन्नधान्य वाटप केले जात आहे.


दरम्यान मालवणी पोलीस ठाण्याचे पीएसआय ज्ञानोबा इंद्राले यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र पुरस्काराने मालाड टीमचे सदस्य विनोद वाघमारे यांच्यामार्फत सन्मानित करण्यात आले त्यात नवी मुंबई येथे सॅनिटायझर हात धुण्याचे स्टॅण्ड , मार्क्स होमिओपथी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले त्यात विशेष बाब नवी मुंबईतील महापे येथील ४० सफाई कर्मचारी व इतर वाहनचालक यांना सुद्धा मोफत सॅनिटायझर ,माक्स, होमिओपॅथी गोळ्या मोफत वाटप करून सफाई कर्मचारी यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या सर्व कामाचे श्रेय मुंबई ,नवी मुंबई , ठाणे टीम प्रकाश शेरे ,दीपक पहुरकर अमित पद्माकर ,दीपक गोसावी सौ निशा फाटक सौ प्रमोदिनी कांबळे श्री कीर्तीकुमार पटेल यांनी सहभाग घेतल्याबद्दल सर्व टीमचे पोलीस बॉईज असोसिएशन कडून मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत असल्याचे कल्याण संपर्कप्रमुख अमित उणावणे यांनी कळविले आहे.