पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी ) रमेश कांबळे
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी ,सामाजिक ,राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील लोक काम करीत आहेत, ही लढाई संपण्यासारखी नाही. आशा व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ,देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. असे खासदार श्रीरंग बारणे यांनी देहूरोड येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या कोविड -१९ कोरोना योद्धा ,सन्मान कार्यक्रमा प्रसंगी सांगितले.
देहूरोड शहर शिवसेना शाखेच्या वतीने ,तीन महिन्याच्या या कोरोना संकटात ज्यांनी ज्यांनी मोलाचे काम केले ,त्यांचा सन्मान ,शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल , देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर , देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड हॉस्पिटलमधील रुग्णालयातील सर्व डॉक्टर ,नर्स ,आशा सेविका या पूर्ण आरोग्य टीमचा तसेच नगरसेवक , रघुवीर शेलार ,राहील बालघरे, बाबा हाजीमलंग, मारीमुत्तु , गोपाळ तंतरपाळे, विशाल खंडेलवाल ,सारिका नाईकनवरे , ऍड.अरुण पिंजण आदींचा , खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते , शाल ,पुष्पगुच्छ ,आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता ,देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयात झाला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त देहूरोड शिवेसना शाखे च्या वतीने आरोग्य सेवक ,पत्रकार ,अनेक सामाजिक संघटना ,त्यांचे प्रतिनिधी यांचा ,शरद हुलावळे ( उप जिल्हा प्रमुख )गजानन चिंचवडे ( जिल्हा प्रमुख) राजू खांडभोर ( मावळ तालुका प्रमुख ) सुनील हगवणे ( देहूगाव शहर प्रमुख ) सुनंदा आवळे ( देहूरोड महिला प्रमुख ) आणि जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे ,यांच्या हस्ते गुलाब पुष्प , सॅनिटायझर ,आणि आर्सेनिक गोळ्या देऊन सन्मानित करण्यात आले.
देशावर आलेल कोरोनाच संकट नेस्तनाबूत करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार खंबीरपणे प्रयत्न करीत आहे.नागरिकांनी त्यात सहकार्याची भूमिका करावी.शक्यतो आपण सोशल डिस्टन्स पाळावे.सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.कोरोना या विषाणूच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांचा सन्मान करून त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना शहर शाखेच्या वतीने हा उपक्रम रामविण्यात आला.असे खासदार श्रीरंग बारणे आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले.
देहूरोड शिवसेना शाखा प्रमुख भरत नायडू , ता.समन्वयक रमेश जाधव , शशी सप्पागुरु, चंदू माहसे , सागर मुंडास ,विजय थोरी ,देवा कांबळे ,आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले होते.