Home शहरे परभणी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथिल गावकर्यांनी केली गावबंदी

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथिल गावकर्यांनी केली गावबंदी

0

पाथरी:- सध्या देशभरासह संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोणा विषाणू मुळे प्रत्येक माणसाच्या मनात भितीचे वातावरण आहे.हा रोग एका व्यक्तिपासुन दुसऱ्या व्यक्तीला होत असल्याने माणसे एकमेकांजवळ येण्याचे टाळत आहेत.कोरोना विषाणुचा संसर्ग भारतात अधीक प्रमाणात होऊ नये म्हणून पंतप्रधान,सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासुन ते सरपंचापर्यंत प्रत्येकजण खबरदारी घेण्याच्या सुचना करीत आहेत.याच पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील मौजे-पोहेटाकळी येथे सरपंच भागवत कुल्थे, उपसरपंच विलास गोंगे,राज राम गोंगेे,ग्रामसेवक आजमखाॅ पठाण, पोलीस पाटील राहुल घुगे, ग्रामपंचायत मारोती पोहेकर,पत्रकार लक्ष्मण उजागरे,सुदाम उजगरे सेवक महादेव गायकवाड आदी गावकर्यानीं गावबंदी केली.

कारण इतर ठिकानहुन लोक गावात ये-जा करीत असल्याने त्यांच्यापासून गावातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे, असे समजावुन सांगुन गावात प्रवेश करता येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर माती दगड आणी काट्या टाकून वाहतूक तात्पुरती बंद केली आहे.